अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: घरात घुसून मारहाण करत तरूणीवर अत्याचार

अहमदनगर- तरूणीच्या राहत्या घरात घुसून मारहाण, दमदाटी करत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. श्रीरामपूर शहरात ही घटना घडली.

 

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वैजापूर तालुक्यातील कापूरवडगाव येथील तरूणास अटक केली आहे.

 

श्रीरामपूर शहरात राहणार्‍या एका 28 वर्षीय तरुणीच्या घरात वैजापूर तालुक्यातील कापूरवडगाव येथील कृष्णा सुभाष घोगटे हा तरुण बळजबरीने घुसून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पिडीत तरुणीने कृष्णा घोगटे याच्या पत्नीशी संपर्क केला असता त्याचा राग आल्याने कृष्णा घोगटे याने या पिडीत तरुणीला मारहाण करुन शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

 

कृष्णा घोगटे याचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय असून तो विवाहित आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पिडीत तरुणीने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी कृष्णा सुभाष घोगटे याचेविरुध्द भादंवि कलम 376, 452, 342, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरुवडे हे करत आहेत.

 

कृष्णा घोगटे याला अटक करुन काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button