अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर- पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान भिंगार कॅम्प पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करून अत्याचार करणारा युवक योगेश कचरू गायकवाड (वय 20 रा. फुलसौंदर मळा, नगर) याला अटक केली आहे.

 

भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीला युवकाने पळवून नेले होते. तशी फिर्याद पीडित मुलीच्या आईने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस.एम. मुगडे या करीत होत्या.

 

मुलीला योगेश गायकवाड याने पळवून नेले असल्याची माहिती भिंगार कॅम्पचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक मुगडे यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या.

 

पोलीस पथकाने पीडित मुलीसह त्या युवकाचा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, बावसी, गोटखिंड, येडे निपाणे तसेच आष्टा पोलीस ठाणे हद्दीत शोध घेतला असता पथकाला मुलगी व मुलगा दोन्ही गोटखिंड (ता. वाळवा, जि. सांगली) येथे आढळून आले. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून पळवून नेऊन अत्याचार करणारा योगेश गायकवाड याच्याविरूध्द भादंवि कलम 376, पोक्सो, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमाव्दारे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button