अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलासह युवकाचे अपहरण

अहमदनगर- अल्पवयीन मुलासह युवकाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना बाबुर्डी घुमट (ता. नगर) शिवारात रविवार, 12 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे.
यासंदर्भात सोमवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा अल्पवयीन मुलगा (वय 16) व त्यांच्या शेजारी राहणारा अजयसिंह विजयसिंह मोगीया (वय 18 रा. मोगीयाका मोहल्ला, पितंबरापीठसमोर, ता. दतिया, राज्य मध्यप्रदेश, हल्ली रा. बाबुर्डी घुमट) या दोघांना रविवारी दुपारी एक वाजता अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे.
याची माहिती पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी नगर तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्या अल्पवयीन मुलासह युवकाचा शोध घेण्याचे काम नगर तालुका पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान कोणत्या कारणातून दोघांचे अपहरण झाले यासंदर्भात माहिती समजू शकली नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत.