अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: शौचालयासाठी मिलिटरी एरियात गेलेल्या वृध्दाचा स्फोटात मृत्यू

अहमदनगर- शौचलयासाठी मिलिटरी एरियात गेलेल्या एकाचा स्फोट होवून मृत्यू झाल्याची घटना घडली. दत्तु गजाबा निकम (वय 57 रा. विळद ता. नगर) असे मयताचे नाव आहे. जखमी झालेल्या निकम यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. त्यांचा 23 जुलै रोजी मृत्यू झाला आहे. पुणे बंडगार्डन पोलिसांनी 1 ऑगस्टरोजी एमआयडीसी पोलिसांना टपालाद्वारे दिलेल्या कागदपत्रांच्याआधारे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार राहुल शिंदे करत आहेत.

 

निकम हे घरातुन शौचालयासाठी घराबाहेर पडले ते दारु पिलेले होते. त्या ठिकाणी ( मिलिटरी एरिया) स्फोट झाला व त्यांचे पोटात क्षार (खडे) गेल्याने त्यांना प्रथम उपचाराकरीता जिल्हा रुग्णालय, नगर येथे नेले व नंतर ससुन हाँस्पिटल, पुणे येथे अँडमिट केले. दरम्यान निकम हे दिनांक 23 जुलै 2022 रोजी 9/30 वा. चे. सुमारास उपचारादरम्यान मयत झालेबाबत डाँक्टरांनी घोषित केले आहे.

 

सदर आमृबाबत बंडगार्डन पोलीस ठाणे पुणे येथे स्टेशन डायरी नोंद क्र.12/2022 दिनांक 24 जुलै 2022 रोजी नोंद घेऊन कागदपत्र टपालाने पोस्टेला काल एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्याने आमृ रजि दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button