अहमदनगर ब्रेकींग: मुल्ला कटर आणि गँगकडून आणखी एका महिलेवर अत्याचार

अहमदनगर- श्रीरामपूर शहरातील मुल्ला कटर आणि त्याच्या गँगने श्रीरामपूर शहरातील एका 40 वर्षीय अपंग महिलेवर दहशत निर्माण करून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात काल चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलांसह अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार करुन त्यांचे धर्मांतर करुन निकाह करणार्या मुल्ला कटर आणि त्याच्या गँगने चांगलीच दहशत निर्माण केली होती. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
श्रीरामपूर शहरातील एका अपंग महिलेला धमकी देवून तिच्यावर दहशत बसवून तिच्या अपंगत्वाचा फायदा घेऊन जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले. मुल्ला कटर गँगच्या दहशतीमुळे ही पीडित महिला तक्रार देण्यास पुढे येत नव्हती.
आता मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी मुल्ला कटर विरुध्द दाखल झाल्याने या पीडित महिलेने धैर्य दाखवत काल तक्रार देण्यासाठी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आली होती.
याप्रकरणी या पीडित अपंग महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी इम्रान युसूफ कुरशी उर्फ मुल्ला कटर, पप्पू गोरे, गुफरान निसारखान पठाण, आशु लियाकत पठाण (सर्व रा. वॉर्ड नं. 2), यांचे विरुध्द भादंवि कलम 376, (2) (एन) (एल) 376 (ड) अ. जा. ज. क्र. कायदा कलम 3(1) (डब्ल्यू) (आय) (आयआय) 3, 2, (व्ही. ए.) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी करत आहेत.
या मुल्ला कटर गँगकडून अजूनही अनेक महिला व अल्पवयीन मुलींवर धर्मांतर करुन अत्याचार झाले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याच प्रकरणात गुन्हेगारांना मदत केल्याप्रकरणी पोलीस नाईक पंकज गोसावी व पोलीस निरीक्षक संजय सानप या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. तरी ज्यांच्यावर या गँगने अत्याचार केले असतील त्या पिडीतांनी पुढे येऊन तक्रार द्यावी यामुळे अशा गुन्हेगारांना कडक शासन करता येऊ शकेल, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.