अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: लष्करी जवानाला साडेआठ लाखांना ऑनलाईन गंडा

अहमदनगर- आर्मड कोअर सेंटरमधील लष्करी जवानाची आठ लाख 46 हजार 358 रूपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. भोपेंदर सरीभलेराम सिंग (वय 42) असे फसवणूक झालेल्या लष्करी जवानाचे नाव आहे. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

30 एप्रिल, 2022 ते 30 ऑगस्ट, 2022 दरम्यान ही घटना घडली असल्याचे फिर्याद म्हटले आहे. दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सिंग यांना वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन येत होते. समोरचा व्यक्ती,‘मी इनकम टॅक्स डिपार्टमेंट (आयकर विभाग) मधून बोलतो’, असे भासवित होता. तो सिंग यांना वेळोवेळी फोन करून म्हणाला,‘तुमचे आयकर विभागाचे 12 लाख रूपये आमच्याकडे जमा झाले आहेत, ते तुम्हाला पाहिजे असल्यास जीएसटी भरावा लागेल’, असे बोलून त्या व्यक्तीने सिंग यांचा विश्‍वास संपादन केला.

 

वेळोवेळी सिंग यांच्याकडून त्या व्यक्तीने सात वेगवेगळ्या नंबरवरील फोन पे, गुगल पे वर एकुण आठ लाख 46 हजार 358 रूपये घेतले. आपली फसवणूक झाल्याचे सिंग यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button