अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलगी घराच्या बाहेर पडताच…

अहमदनगर- केडगाव उपनगरातील एका अल्पवयीन मुलीचे (वय 17) अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आजीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अल्पवयीन मुलगी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घरात कोणास काही न सांगता निघून गेली आहे. या मुलीच्या आजीने नातेवाईकांच्या मदतीने तिचा शोध केडगाव उपनगर आणि अहमदनगर शहरात घेतला असता, ती कोठे ही आढळून आली नाही.

 

अखेर कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली आहे. कोणीतरी व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी तिचे अपहरण केले आहे, असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button