अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने हल्ला

अहमदनगर-भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना सोनई (ता. नेवासा) बसस्टँड येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. 26) रोजी दुपारी 3.15 वाजेच्या दरम्यान राहील उर्फ मोईन रफिक अत्तार व सना राहील उर्फ़ मोईन अत्तार हे सोनई बसस्टँड येथे करदोटे विकत असताना त्या ठिकाणी दिपक फ्रांन्सीस काकडे (रा. सोनई) याने राहील उर्फ़ मोईन अत्तार यास दमदाटी व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तु माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतोस काय. असे म्हणत राहील अत्तार या युवकावर हल्ला करत जखमी केले.

 

आता तुला मि जिवंत सोडणार नाही. असे बोलत असताना आरोपी दिपक काकडे याने आपल्या खिशातून धारदार चाकु काढून राहील उर्फ़ मोईन अत्तार याच्या अंगावर वार करत जखमी केले. सदर घटनेतील आरोपीस सोनई पोलीसांनी काही वेळातच अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button