अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: चिकणची उधारी मागितल्याने व्यावसायिकाचा खूनाचा प्रयत्न

अहमदनगर- चिकणच्या उधारीच्या रकमेची मागणी करणार्‍या व्यावसायिक तरूण सागर एकनाथ अवसरे (वय 26 रा. रेणविकर कॉलनी, निर्मलनगर, सावेडी) यांच्यावर चौघांनी कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

जखमी अवसरे यांनी उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आकाश जाधव, साहिल शिंदे, शरद फुलारी, विशाल शिंदे (सर्व रा. तपोवन रोड, सावेडी) या चौघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सागर अवसरे यांचे तपोवन रोडवरील दोस्ती हॉटेलशेजारी सागर चिकन शॉप आहे. ते 7 नोव्हेंबर रोजी सकाळी शॉपवर असताना आकाश व साहिल चिकन घेण्यासाठी आले. त्यांनी उधार चिकन देण्याची मागणी केली असता सागरने त्यांना मागील उधारी 750 रूपये देण्याचे सांगितले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली.

 

यानंतर सायंकाळी शरद व विशाल तेथे आले. त्यांनी आकाश व साहिल सोबत झालेल्या वादावरून सागर यांना शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत डोक्यात कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

 

 

चौघांच्या मारहाणीत सागर अवसरे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button