अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: खुनाच्या गुन्ह्यातील युवकाचा खुन करण्याचा प्रयत्न

अहमदनगर- खूनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या अशितोष संतोष वराडे (वय 21 रा. चिंचवड गाव ता. हवेली जि. पुणे) या युवकाला दोघांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव बायपास येथे घडली. या प्रकरणी त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

धनेश्‍वर राजाराम खेंगरे (रा. हिंजवडी ता. मुळशी, जि. पुणे) व प्रकाश भानुदास नलके (हल्ली रा. हिंंजवडी, पुणे, मुळ रा. ओनिवाडी ता. जत जि. सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अशितोष वराडे हे केडगाव बायपास येथील रस्त्यालगत असलेल्या एका पानटपरीकडे जात असताना त्यांच्या ओळखीचे धनेश्‍वर व प्रकाश तेथे आले. त्यांचा साथीदार अकाश लांडगे याचा अशितोष याने साथीदारासह खून केलेला आहे, हा राग मनात धरून अचानक धनेश्‍वरने,‘तु आकाशची व्हिकेट टाकली, आता तुझी बारी,’ असे म्हणत हातातील सत्तुराने अशितोष यांच्यावर वार केला असता तो वार आशितोष यांनी हुकविला व जीव वाचविण्यासाठी ते पळत सुटले.

धनेश्‍वर व प्रकाश हे आशितोषच्या मागे पळाले, स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आशितोषसह धनेश्‍वर व प्रकाश यांना ताब्यात घेतले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button