अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पोटात चाकू खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर- दुचाकी व्यवहाराच्या वादातून एकावर चाकूने वार केल्याची घटना सोनई परिसरातील मुळा कारखाना चौकात घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात पिता-पुत्रावर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी, मुळा कारखाना चौकात गुरुवार दि. 24 रोजी दुचाकीच्या जुन्या व्यवहारातून चाकूने वार केल्याची घटना घडली. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात मन्सूर काशीम पठाण (वय 20) धंदा-मजुरी रा. तिरमल वस्तीजवळ मुळा कारखाना यांनी फिर्याद दिली.

 

फिर्यादीत म्हटले की, गुरुवार दि. 24 नोव्हेंबर रोजी मुळा कारखाना चौकातील पानटपरी समोर हसन मेहबूब शेख व त्याचा मुलगा सद्दाम हसन शेख यांनी मोटारसायकलच्या जुन्या व्यवहाराच्या कारणावरून सुलतान गफूर पठाण यांना शिवीगाळ करून पोटात चाकू खुपसून जखमी केले व दोघेही आरोपी शिंगणापूरच्या दिशेने मोटारसायकलवरून पळून गेले.

 

या फिर्यादीवरून सोनई पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 435/22 भारतीय दंड विधान कलम 307, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तपास करत आरोपींना अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू थोरात करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button