अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या महिलेवर ठेकेदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न

अहमदनगर – नगर शहरात मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या महिलेवर ठेकेदाराने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या महिलेच्या फिर्यादीवरून ठेकेदाराविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन जालिंदर चव्हाण (रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे.

 

परराज्यातील एक दांम्पत्य मोलमुजरीसाठी नगर शहरात राहत आहे. दोघेही मजुरीचे काम करतात. ठेकेदार बबन चव्हाण याने परप्रांतिय महिलेला शुक्रवारी (दि.2) दुपारी दीड वाजता भिस्तबाग महाल भाग येथील बांधकाम सुरू असलेल्या एका घरी बोलविले.

 

याठिकाणी महिलेला बांधकाम कामासाठी लागणारी कच घेऊन घरात बोलविले. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. या महिलेने घराचा दरवाजा उघडून घराबाहेर पळ काढून स्वतःचा बचाव केला.

 

घरी आल्यानंतर तिनेही घटना पतीला सांगितली. त्यानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिलेने दिलेले फिर्यादीवरून ठेकेदार बबन चव्हाण याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button