अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ग्रेनाईच्या तुकड्याने मारहाण करून खुन

अहमदनगर- नगर तालुक्यातील वाकोडी गावातील चौकात चौघांनी सुनील रामभाऊ नवगिरे (रा. वाकोडी) यांना शिवीगाळ, दमदाटी करून ग्रेनाईच्या तुकड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. दरम्यान त्यांचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

सुरूवातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत सुनीलची आई रूक्मिणी नवगिरे यांनी फिर्यादी दिली होती. त्यात वाढीव खुनाचे कलम लावण्यात आले आहे. पोलिसांनी आज (बुधवार) संशयीत आरोपी सागर जगन्नाथ नवगिरे (वय 31 रा. वाकोडी) याला ताब्यात घेत अटक केली आहे.

 

24 ऑगस्ट, 2022 रोजी सुनील हा चार वाजता कामाचे पैसे घेऊन येतो म्हणून घरून गेला तो पुन्हा घरी आला व सायंकाळी सहा वाजता मळ्यातून येतो म्हणून गेला तो पुन्हा त्या दिवशी घरी आलाच नाही.

 

दरम्यान 24 ऑगस्ट रोजी रात्री दीड वाजता सुनील याला योगेश (पूर्ण नाव माहिती नाही) याने घरी आणले तेव्हा सुनीलच्या डोक्यावर व कपाळावर जखमा होत्या. तेव्हा फिर्यादी यांनी सुनीलला विचारले तुला कोणी मारले. तेव्हा त्याने फिर्यादीला सांगितले की,‘मला किशोर सुर्यवंशी, मोढवे, सागर नवगिरे, अविनाश नवगिरे (पूर्ण नावे माहिती नाही) यांनी वाकोडी गावातील चौकात शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली व ग्रेनाईच्या तुकड्याने मारहाण करून जखमी केले’. दरम्यान मारहाणीचे कारण त्याने फिर्यादी यांना सांगितले नव्हते.

 

त्याच रात्री सुनीलला त्रास होवू लागल्याने त्याला सुरूवातीला जिल्हा शासकीय रूग्णालयात व नंतर पुणे येथील ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button