अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला

अहमदनगर- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील बेपत्ता झालेला तरुणाचा मृतदेह प्रवरा डाव्या कालव्यात नजीक कारखाना परिसरात लोहगाव शिवरात आढळला. या तरुणांनी निर्जन ठिकाणी जाऊन विष घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी दिली.

 

प्रवरा कारखान्याचे कर्मचारी कामावर येत असताना कॅनलच्या कडेला अनोळखी इसम मृतअवस्थेत दिसला. कर्मचार्‍यांनी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी नंदकुमार डेंगळे यांना माहिती दिली त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, सुदाम फटांगरे, आशिष सय्यद घटनास्थळी आले.

 

लोणी पोलीस स्टेशनला मिसिंग नोंदवलेल्या व्यक्तीला घटनास्थळी बोलवून मृत व्यक्तीची ओळख पटवली. मयत इसम बाभळेश्वर येथील विकास गोरक्ष पुरी (वय 27) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button