अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

अहमदनगर- एका 40 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. शिल्पा गार्डन समोर भोसले आखाडा कमानीच्या आतमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे.

 

सुरूवातीला महिला बेशुध्द अवस्थेत आढळून आली होती. दरम्यान तीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 

तिची ओळख पटली नसून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

शुक्रवारी रात्री नऊ वाजता भोसले आखाडा कमानीच्या आतमध्ये 40 वर्षीय महिला बेशुध्द अवस्थेत आढळून आल्याने तिला पोलीस अंमलदार आर.बी.फसले यांनी रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.

 

दरम्यान उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही महिला कोण आहे? तिची ओळख पटली नसून ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button