अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: दगडाने ठेचलेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळला

अहमदनगर- एका ४० वर्षीय बेवारस महिलेचा दगडाने ठेचलेल्या स्थितीत संशयास्पद मृतदेह कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथे आज आढळून आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथे रेल्वेस्टेशन जवळ असलेल्या काशिनाथ लोणारी कॉम्प्लेक्स या ठिकाणी एक बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाजवळ ठिकठिकाणी रक्ता सांडलेले दिसून येत होते. तसेच मृतदेहा जवळ दगड पडलेले असल्याने हा घातपात असल्याचा संशय निर्माण होत असून शहर पोलीस घटणास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला आहे.

 

या महिलेला एक अज्ञात इसम ओढत असतानाचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सदर महिलेचा खून झाला असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सदर घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

सदर मृतदेह रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला असून हा घातपात आहे की अपघात हे आता पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पो. नि. वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button