अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: नदीपात्रात आढळला तरुणाचा मृतदेह

अहमदनगर- नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील प्रवरा नदीच्या पुलाच्या खाली नदीपात्रातील पाण्यात नेवासा शहरातील लक्ष्मीनगर येथील किशोर छबुराव वडागळे (वय 40) यांचा मृतदेह मिळून आला. याबाबत नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याची माहिती नेवासा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.