अहमदनगरकोपरगावताज्या बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाचा मृतदेह सापडला

कोपरगावातील कान्हेगाव येथील रहिवासी असलेला तरुण सोमनाथ जाधव हा रविवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आला. त्याची ओळख पटल्यावर त्यास कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.

कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव शिवारात सोमनाथ बाळासाहेब जाधव (वय २६, रा. कान्हेगाव, ता. कोपरगाव) या तरुणाचा मृतदेह रविवारी रात्री गोदावरी नदीच्या पुलाजवळ आढळून आला.

कोपरगावातील कान्हेगाव येथील रहिवासी असलेला तरुण सोमनाथ जाधव हा रविवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आला. त्याची ओळख पटल्यावर त्यास कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.

तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यास मयत घोषित केले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

Advertisement

दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल एस. एन. शेख यांनी भेट दिली. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button