अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ युवकाचा मृतदेह; घात की अपघात?

अहमदनगर- एका युवकाचा श्रीरामपुरातील ओव्हर ब्रिजजवळ रात्रीच्या वेळी मृत्यू झाला. अक्षय सुभाष दांगट असे त्या युवकाचे नाव आहे. तो सूतगिरणी रोडवर राहणारा असून त्याची दुचाकी नेवासा रोड येथील भुयारी पुलाजवळ आढळल्याने युवकाचा घात की अपघात? याबाबत विविध तर्क वितर्क लढविले जात आहेत.

 

अक्षय दांगट हा श्रीरामपुरातील संगमनेर रोडवर मेसचा व्यवसाय करत होता. त्याचा मृतदेह नेवासा रोडवर असणार्‍या ओव्हर ब्रिजजवळील रेल्वे रूळावर आढळून आला. त्याच्या अंगावर जखमा झालेल्या होत्या.

 

त्याचा मृतदेह ओव्हर ब्रिजच्या जवळील रेल्वे रूळावर आढळला तर त्याची दुचाकी इतक्या अंतरावर नेवासारोडवरील रेल्वे अंडरग्राउंंड पुलाजवळ कशी? असा सवाल सदर युवकाच्या अंत्यविधी प्रसंगी लोकांच्या चर्चेमधून विचारला जात होता. त्यामुळे सदर युवकाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी कसून तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button