अहमदनगर

अहमदनगर ब्रेकिंग : लग्नासाठी गावी आले आणि कुटुंबच उधवस्त झाले..

शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा पुण्याला जात असताना अहमदनगर- पुणे महामार्गावर रांजणगाव एमआयडीसी जवळ झालेल्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

राज्यातील महामार्गांवर भीषण अपघाताची मालिका सुरु आहे. यात पुणे – अहमदनगर महामार्गावरही आज भीषण अपघात झाला आहे. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

उलट्या दिशेने आलेल्या ट्रकला कारने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. पुणे येथील रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला आहे. मृत्यू झालेले सर्व प्रवासी पनवेलला जाण्यासाठी निघाले होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील संजू म्हस्के यांचे कुटुंब सध्या पनवेल येथे स्थायिक आहे. संजू म्हस्के यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने हे कुटुंब त्यांच्या मूळ गावी शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथे आले होते.

लग्नाचा कार्यक्रम उरकून हे कुटुंब पुण्याकडे जात असताना पहाटे अहमदनगर- पुणे मार्गावर रांजणगाव एमआयडीसीजवळ एका कंटेनरच्या धडकेत संजय म्हस्के (वय ५५), रामा म्हस्के (वय ३९), राजू म्हस्के (वय ७), विशाल म्हस्के (वय १६), हर्षदा म्हस्के (वय ४) यांचा मृत्यू झाला असून रामा म्हस्के यांची पत्नी गंभीर जखमी आहे.

रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहन हटवण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button