अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: लग्नाचे आमिष अन् बदनामीची धमकी देत कॉलेज तरूणीवर अत्याचार

अहमदनगर- कॉलेज तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली. पीडित तरूणीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात शिवाजी बाबासाहेब मोरे (रा. लाख ता. राहुरी) याच्या विरोधात अत्याचार व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

18 वर्षीय तरूणी शिक्षण घेत आहे. डिसेंबर 2021 ते 2 जुलै 2022 या दरम्यान शिवाजी मोरे याने त्या पीडित तरुणीला राहुरी तालुक्यातील लाख येथील फॉर्म येथे बोलावून घेतले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला.

 

तसेच तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीतर तुझी बदनामी करेन. अशी धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर पीडित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

 

पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा व महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके आदी फौजफाट्याने घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. पीडित तरूणीच्या फिर्यादीवरून पोलिसांत शिवाजी मोरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर मोरेला ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button