अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: महाविद्यालयीन युवतीला फूस लावून पळविले

अहमदनगर- श्रीरामपूर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणार्या युवतीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात पीडित युवतीच्या वडिलांनी श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील युवती 18 नोव्हेंबर रोजी रात्री आई-वडिलांसोबत जेवण करून सर्वजण रात्री 9.30 च्या सुमारास झोपले होते. पहाटे 4 च्या सुमारास या मुलीची मोठी बहीण उठली असता तिला शेजारी झोपलेली लहान बहीण दिसली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला असता सदर युवती सापडली नाही.
याबाबत अज्ञात इसमाने आमच्या राहत्या घरातून या मुलीस फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला असून श्रीरामपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.