अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: कंटेनरने तरूणाला चिरडले; मनमाड रस्त्यावर आठवड्यात तिसरा बळी

अहमदनगर- तरूणाचा नगर मनमाड रस्त्यावरील खड्याने बळी घेतल्याची दुर्देवी घटना शनिवारी दुपारी राहुरी फॅक्टरी परिसरात घडली. दुचाकीवरून घराकडे निघालेल्या औरंगाबाद येथील योगेश सहादेव सानप (वय 27) असे मयत तरूणाचे नाव आहे.

 

शनिवारी सकाळ पासून नगर-मनमाड मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. तीन तासापासून वाहतूक ठप्प असतानाच नगर मनमाड रस्त्याने घरी श्रीरामपुर मार्गे औरंगाबादकडे जाणारा योगेश सानप रस्त्यावरील खड्याचा बळी ठरला आहे. राहुरी फॅक्टरी येथे नर्सिंग होम समोर असलेल्या मोठ्या खड्यामध्ये त्याची दुचाकी अडखळली. रस्त्याच्या कडेला मोठी कपार निर्माण झालेली आहे. त्या कपारीवरून दुचाकी खाली पडल्याने तो तरूण रस्त्यावर पडला. पाठीमागून आलेल्या कंटेनरच्याखाली तो तरूण सापडला.

 

दरम्यान राहुरी येथे एका तरुणाचा चार दिवसापूर्वी खड्यामुळे बळी गेल्यानंतर गुरुवारी डिग्रस फाट्यावर खड्यामुळे एका महिलेला आपला जिव गमवावा लागला. तर शनिवारी दुपारी राहुरी फॅक्टरी येथे एका तरुणाचा खड्यामुळे जिव गेला.

 

आठवड्याच्या आत या रस्त्याने तिन बळी घेतले आहेत. हा रस्ता आणखी किती बळी घेणार? आणखी किती बळी गेल्यानंतर सरकारला या बाबत जाग येणार आहे ? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button