अहमदनगर ब्रेकींग: गावठी कट्टा व दागिन्यांसह सराईत गुन्हेगार अटकेत

अहमदनगर- गावठी कट्टा व चांदीच्या दागदागिण्यांसह सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात सोनई पोलिसांना यश आले आहे. गुन्हेगार नितीन उर्फ ठकन भाऊसाहेब आल्हाट असे त्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त माहिती मिळालेवरून त्यांनी सोनई पोलीस ठाण्याच्या पथकाला सूचना करून नितीन उर्फ ठकन भाऊसाहेब आल्हाट (वय 30) रा. मोरेचिंचोरे ता. नेवासा यास गावठी कट्टा व चांदीच्या दागिनेसह ताब्यात घेतले.
या आरोपी विरुध्द सोनई पोलीस ठाण्यात गुरनं. 352/2021 भादंवि 307, 324, 504, 506, 143, 147, 148, 14, 427 आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे तसेच इतर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून तो पसार होता.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.