अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: चारीमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला

अहमदनगर- वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील चारी नंबर 9 या ठिकाणी घडली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

चारी नंबर 9 या ठिकाणी वयोवृद्ध महिलेचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी निपाणी वडगाव येथील कामगार पोलीस पाटील श्री. गायधने यांना दिली. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून श्रीरामपूर शहर पोलिसांना खबर दिली.

 

घटनास्थळी पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस नाईक शरद अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड, प्रवीण कांबळे यांनी भेट देत सदरचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे हलविण्यात आला. यासंदर्भात सदर वयोवृद्ध महिलेचे वर्णन व माहिती स्थानिक नागरिक तसेच परिसरात देण्यात आली यावरून तिची ओळख पटली आहे.

 

सदरची महिला भागुबाई संपत दाभाडे अंदाजे (वय 80 ते 85) लाटे वस्ती येथील आहे. या संदर्भात अमोल पंडीत कुंजीर यांनी खबर दिली पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button