अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अमरधाममध्ये आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

अहमदनगर- अमधारधामजवळ काल दुपारी एका अनोळखी इसमाचा मुतदेह आढळून आल्याने गोंडेगावात (ता. श्रीरामपूर) खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा या विषयी तर्कवितर्क लावले जात होते. दरम्यान अमरधाम येथे एक इसाम बाकावर दुपारपासून झोपलेला गावातील काही तरुणांना दिसला. काहींना सायंकाळच्यावेेळी कामावरून येत असतांना ती व्यक्ती हालचाल करत नसल्याचे आढळून आले.

 

ही बातमी वार्‍यासारखी गावात पोहचली. अमधारधामजवळ मृतदेह आढळून आल्याने गावात त्या व्यक्तीबाबत चर्चा होत होती. काहींनी या घटनेची माहिती पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके व तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांना मोबाईलद्वारे दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

 

या अनोळखी मृत इसमाचे वय साधारण अंदाजे 50 ते 55 वर्षाचे असून त्यांच्या अंगात चौकटी रंगाचा निळा पांढरा रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट असून तो अमरधाम बाहेर असणार्‍या बाकावर झोपलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यांच्या शर्टच्या खिशामध्ये काही दवाखान्याचे कागदपत्रे आढळून आल्याचे दिसले. काही कागदपत्रे प्रेमाबाबतची होती. सदरचा इसम उल्हासनगर येथील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

 

याठिकाणी या ठिकाणी सहाय्यक फौजदार सतिश गोरे, श्री. आगलावे, श्री. लोंढे यांनी मृतदेहाची प्रत्यक्ष पाहणी केली. याकामी पोलीस पाटील बाळकृष्ण वाणी, कोतवाल आण्णासाहेब कुर्‍हाडे यांनी मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button