अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: गजबजलेल्या मैदानात आढळला अनोळखी वृध्दाचा मृतदेह

अहमदनगर- नगर शहरातील गजबजलेल्या गांधी मैदानावर एका 68 वर्षीय अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

सकाळी गांधी मैदान येथे एक वृध्द व्यक्ती बेशुध्द अवस्थेत आढळून आली होती. याची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली.

 

पोलीस घटनास्थळी आले. रूग्णवाहिका बोलवण्यात आली. त्यांनी या वृध्दाला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून वृध्दाला मृत घोषित केले. दरम्यान वृध्दाची ओळख पटलेली नसून त्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button