अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: बसस्थानक परिसरात आढळला तरूणाचा मृतदेह

अहमदनगर- नगर शहरातील कायम गजबजलेल्या तारकपूर बस स्थानकासमोर गुरूवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एका टपरीमध्ये एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या तरूणाची ओळख पटली नसून पोलिसांकडून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.

 

याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एका टपरीमध्ये तरूण बेशुध्द अवस्थेत आढळून आल्याची माहिती नागरिकांनी तोफखाना पोलिसांना कळविली होती. तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. काही वेळात रूग्णवाहिकेसह डॉक्टरही आले.

 

डॉक्टरांनी त्या तरूणाची तपासणी करून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button