अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: विहिरीत आढळला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

अहमदनगर- विहिरीमध्ये काल (शुक्रवारी) सकाळी एका महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 7 भागामध्ये असणार्‍या एका विहिरीमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे.

 

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काल पहाटे श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 7 भागामध्ये असणार्‍या उत्सव मंगल कार्यालयापुढे पूर्वेला 100 मीटर वर रोड जवळील चर-ओढ्याच्या जवळ मॉर्निंग वाकसाठी फिरायला येणार्‍या काही नागरिकांना त्या विहिरीत मृतदेह आढळून आला.

 

त्यानुसार त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना संपर्क केला आहे. यावर्षी पावसाळ्यात प्रचंड पाऊस झाल्यामुळे सर्व विहिरी तुडूंब भरल्या आहेत. ही देखील विहीर तुडूंब भरल्यामुळे विहिरीत विविध प्रकारची घाण, कचरा गोळा झाला आहे. तरंगलेल्या या कचर्‍यातच या महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला.

 

सदर मयत महिलेचे वय साधारण 40 ते 45 असल्याचे दिसून येत होते. ही महिला नेमकी कोण? या महिलेने आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे ? याबाबी लवकरच पोलीस तपासात स्पष्ट होतील. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button