अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: नक्षलवाद्यांशी चकमक, जिल्ह्यातील जवान आसाममध्ये शहीद

अहमदनगर – शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील रहिवासी मेजर सचिन रामकिसन साळवे (वय 33) हे आसाममधील गुवाहाटी येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये गोळी लागून शहीद झाले.

 

त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांचा लहान भाऊ राहुल साळवे हा भारतीय लष्करामध्ये नवसारा जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहे. त्यांचे पार्थिव उद्या गुरूवारी 11 वाजेच्या दरम्यान शेवगाव तालुक्यातील राक्षी येथे त्यांच्या राहत्या गावी आणण्यात येणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले

 

बुधवारी एक ते दीडच्या दरम्यान आसाममध्ये गुवाहाटी येथे मेजर साळवे हे शहीद झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबाला भारतीय लष्कराकडून देण्यात आली. मेजर साळवे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राक्षी येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण शेवगाव येथे पुर्ण झाले. ते भारतीय लष्करात 2011 ला भरती झाले.मेजर साळवे शहीद झाल्याची घटना त्यांच्या गावी मिळाल्यानंतर राक्षी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. मेजर साळवे यांची नक्षलवाद्यांबरोबर चकमक झाली व त्यांना त्यामध्ये गोळी लागून वीरमरण आल्याचे सांगण्यात येते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button