अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

अहमदनगर- नगर तालुक्यातील नारायणडोह शिवारात बाबासाहेब फुंदे यांच्या शेतामध्ये रविवारी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यापूर्वीही नारायणडोह शिवारात अशी वस्तू अनेकवेळा आढळून आली होती. एकदा त्याचा स्फोट झाल्या होता.

 

या बॉम्ब सदृश्य वस्तूची नगर तालुका पोलिसांसह बॉम्बशोधक पथकाने पाहणी केली असून ते निकामी करण्यात येत आहे. फुंदे यांच्या शेतामधील मुरूमामध्ये ही बॉम्ब सदृश्य गोल आकाराची लोखंडी वस्तू दिसून आली होती. याबाबतची माहिती नगर तालुका पोलीस, लष्कराच्या अधिकार्‍यांना देण्यात आली. लष्कराचे बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ती वस्तू निकामी करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button