अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग:महामार्गावर तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर- नगर-औरंगाबाद महामार्गावरील नगर तालुक्यातील बायजाबाई जेऊर टोलनाका येथे एक तरूण मृतअवस्थेत आढळून आला आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे.

 

दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविला आहे.

 

जेऊर टोलनाका येथे एका अनोळखी 35 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

मयत तरूणाची ओळख पटलेली नाही. तो कोण?, त्याचा मृत्यू कशाने झाला? आदी तर्क विर्तक वर्तविले जात आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडकीस आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button