अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात बाप- लेकासह बालकाचा मृत्यू

अहमदनगर- ट्रक व दोन दुचाकींचा भीषण अपघातात बाप-लेकासह नातवाचा मृत्यू झाला. राहुरी येथील नगर- मनमाड महामार्गावर जोगेश्वरी आखाडा परिसरात आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या अपघातात पाथर्डी तालुक्यातील तीसगाव जवळील मोहज येथील प्रकाश मोहन ठोकळ (वय 65), शुभम प्रकाश ठोकळ ( वय 25), सायरस प्रविण जाधव (वय 5) यांचा मृत्यू झाला आहे.
हे सर्वजण वेगवेगळ्या दोन दुचाकीवरून शिर्डीकडे नातवाला शाळेतील वस्तीगृहात पोहोच करण्यासाठी जात असतांना राहुरी येथील जोगेश्वरी आखाडा परिसरात शिर्डीच्या दिशेने सिमेंट घेऊन जाणार्या ट्रकला (एमएच 16 सीडी 2066) धक्का लागल्याने दोन्ही दुचाक्या ट्रक खाली आल्याने सुमारे 50 ते 60 फुटांपर्यत त्यांना ट्रकने फरफटत नेले.
या अपघातात दोन्ही दुचाकीचा ट्रक खाली चक्काचूर झाला आहे. महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली होती.