अहमदनगर ब्रेकींग: उड्डाणपुलावर पहिला बळी; अपघातात वकीलाचा मृत्यू

अहमदनगर- दुचाकीच्या अपघातात नगरमधील अनिरुद्ध रामचंद्र टाक (वय ४६) या वकिलाचा मृत्यू. पुलावरील वळणावर आज रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. ऍड. टाक आपल्या दुचाकीवरून जात होते. एक वाहन त्यांना धडक देऊन निघून गेले.
घटनास्थळी पोहचलेले घरघर लंगर सेवेचे प्रमुख, हरजितसिंग वधवा यांनी पोलिसांना फोन केला. जखमी होऊन टाक यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या खिशातील व्हिजिटिंग कार्ड वरून ओळख पटली. ते एकटेच प्रवास करीत होते.
दुचाकील जेवणाचे पार्सल लावलेले होते. त्यांच्या मोबाईल मधील नंबर शोधून हरजीतसिंह वधवा आणि पोलीस यांनी टाक यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला. टाक यांचे कुटुंबीय बाहेर गावी गेलेले असून टाक एकटेच घरी होते. त्यामुळे अन्य नातेवाईक तेथे आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील प्रक्रिया सुरु केली.
ॲड. टाक अहमदनगरच्या कामगार न्यायालयात वकिली करत होते. हा पूल झाल्यापासून त्यावर छोटे मोठे अपघात होत आहेत. आज एक मृत्यू झाला. त्यामुळे या पुलाची रचना आणि वाहतूक नियोजनातील त्रुटी यावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.