अहमदनगर ब्रेकींग: डिझेल टाकीच्या स्फोटात चौघे…
अहमदनगर- शेवगाव शहरात जुनी चारचाकी तोडत असतांना डिझेल टाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
बबन शेषेराव तुजारे, ज्ञानेश्वर पांडूरंग गायकवाड (दोघे रा. दादेगाव ता. शेवगाव), आनिस काझी व शकील चाँद शेख (दोघे रा.शेवगाव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
शेवगाव शहरातील नेवासा रस्त्यावरील एका भंगाराच्या दुकानामध्ये आज (बुधवार) दुपारी तीन वाजेच्या सुमारास हे चार जण जुनी चारचाकी गाडी तोडण्याचे काम करीत होते. त्यावेळी डिझेल टाकी जोडीत असतांना तिचा स्फोट होवून हे चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील नागरीकांनी त्वरीत शेवगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्यातील तुजारे व गायकवाड हे जबर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत शेवगाव पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.