अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पाच जणांकडून युवतीवर सामुहिक अत्याचार

अहमदनगर- येथील एका संस्थेत राहत असलेल्या युवतीवर शिर्डीमध्ये सामुहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पीडित युवतीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान पीडित युवतीने एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाच अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या अमानवी भयंकर घटनेची अधिक माहिती अशी की, नगर परिसरातील एक 21 वर्षाची युवती शिर्डीत आली असता ती मंदिर परिसरात थांबली होती, त्यावेळी अनोळखी पाच नराधम रात्रीच्या वेळी या युवतीला आम्ही तुला जेवण देतो असे सांगून एका शिर्डीतील खोलीत नेले व तेथे तिचे हातपाय बांधून, तोंडात बोळा कोंबून, एका-एकाने जबरदस्तीने आळीपाळीने पीडित युवतीवर अत्याचार केला.

 

या भयंकर संकटांनी हादरून गेलेली युवती कशीबशी सावरली तिला सध्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असून रुग्णालयात तिने वरील प्रमाणे जबाब दिल्यावरून अज्ञात पाच नराधम आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिसात भादवि कलम 376-ड, 34 प्रमाणे जबरी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी डीवायएसपी अजित पाटील यांनी भेट दिली पुढील तपास पोसई पाठक हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button