अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: युवतीने नदीपात्रात मारली उडी; पुढे घडलं असं…

अहमदनगर- नेवासा येथील प्रवरा नदीवरील पुलावरून नेवासा फाटा येथील एका युवतीने (वय २२) उडी मारल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने ती युवती बचावली.

 

युवतीने नदीवरील पुलावरून उडी मारल्याची माहिती समजताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तुळशीराम गिते यांनी स्थानिक युवकांना सोबत घेऊन नदी पात्राकडे धाव घेतली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी नदी पात्रालगत राहणाऱ्या सचिन गरुटे या युवकास नदी पात्रात चप्पू घेऊन जाण्यास सांगितले.

 

सचिन याने सुमारे अर्धा तास अथक प्रयत्न करून सदर युवतीस वाचविले. त्यानंतर या युवतीस घरच्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर घटनेमागील कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. सदर घटनेची गांभीर्यता ओळखून तत्परता दाखवून युवतीस वाचविल्याबद्दल पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या हस्ते सचिन गरुटे व अंमलदार गीते यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button