अहमदनगरताज्या बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : पतीकडून ५० लाखांसाठी पत्नीचा छळ ! अहमदनगर मधील वाकळे परिवाराविरोधात गुन्हा दाखल !

एवढ्यावरच प्रकरण थांबले नाही. जावयाने पुन्हा ५० लाखांची मागणी करत पत्नीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू सासऱ्यांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीचे थाटामाटात लग्न करून दिले. लग्नात मुलीला १२, तर जावयाला ३ तोळे सोने घातले. एक वर्षानंतर मदत म्हणून हॉटेल दुरुस्तीसाठी १५ लाख रोख दिले.

एवढ्यावरच प्रकरण थांबले नाही. जावयाने पुन्हा ५० लाखांची मागणी करत पत्नीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू सासऱ्यांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती सूरज आबासाहेब वाकळे, आबासाहेब जगन्नाथ वाकळे, उर्मिला आबासाहेब वाकळे (सर्व राहणार वाकळे पाटील फार्म हाउस, सावेडीगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शिल्पा सूरज वाकळे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांचा सूरज वाकळे याच्याशी २०२० मध्ये विवाह झाला. लग्नानंतर वर्षभर त्यांना सासरच्यांनी व्यवस्थित नांदविले. त्यानंतर त्यांना त्रास देणे सुरू झाले.

पती व सासऱ्यांनी हॉटेल दुरुस्तीसाठी शिल्पा यांच्याकडे १५ लाखांची मागणी केली. त्यांच्या सांगण्यावरून काका व आजोबांनी १५ लाख रुपये घरी आणून दिले.

त्यानंतर सहा महिन्यांनी माहेरून आणलेले पैसे परत कधी करणार अशी विचारणा शिल्पा यांनी पती सूरज याच्याकडे केली. त्यावर देऊन टाकू, असे सांगून पैसे देण्यास पतीने टाळाटाळ केली. त्यानंतर कोरोना आला.

त्यावेळी पतीने कोरोनाकाळात वडिलांच्या उपचारासाठी १० हजा रुपये मागितले. शिल्पा यांच्य काकांनी सूरज यास ९० हजार रुपये दिले. एवढेच नाही तर हॉटेलच्या कामासाठी पतीने मागितलेले ५८ हजार रुपयेही दिले. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये पती व सासऱ्यांनी बँकेच कर्ज फेडण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये घेऊ ये,

अशी मागणी शिल्प यांच्याकडे केली. याबाबत शिल्प यांनी माहेरच्यांना कळविले माहेरच्यांनी हे पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने शिल्पा यांच छळ सुरू केला. त्यामुळे त्यांनी भरोसा सेलमध्ये तक्रार केली. पण, समझोता झाला नाही, असे फिर्यादीत म्हटल आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button