अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: माहेरून 30 लाख आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ

अहमदनगर- हडपसर (पुणे) येथे सासरी नांदत असलेल्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या सहा लोकांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी व फ्लॅटचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून 30 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ सुरू होता.

 

याबाबत हडपसर (पुणे) येथील 30 वर्षीय महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सासरी नांदत असताना तुझ्या वडिलांनी लग्नात चांगले जेवण केले नाही. तुला इंग्लिश बोलता येत नाही. तुला घरात स्वच्छता ठेवता येत नाही. असे म्हणून त्या आजारी असताना त्यांना उपाशीपोटी ठेवले. गाडीचे व फ्लॅटचे हप्ते भरण्यासाठी 30 लाख रुपये तुझ्या आई-वडिलांकडून घेऊन ये, अशी मागणी करून वारंवार शारीरिक मानसिक त्रास देऊन छळ केला.

 

तसेच फिर्यादी व तिच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली. या फिर्यादीवरून पती अक्षय जयवंत कसोटे, सासरा जयवंत विनोद कसोटे, सासू संगीता जयवंत कसोटे, दीर आकाश जयवंत कसोटे, सर्व रा. हडपसर (पुणे) तसेच अनिल साळवे, विजया अनिल साळवे दोघे रा. दापोली जि. पुणे. या सहा जणांवर गुन्हा रजि. नं. 1098/2022 भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार साईनाथ टेमकर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button