
अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे , जिल्ह्यात सातत्याने पाऊस पडत असून पाऊस सक्रीय झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने मुळाधरणातून आज दुपारी १२ वाजता नदीपात्रात १० हजार क्युसेकने विसर्ग सोडला असल्याची माहिती पाटबंधारे खात्याच्या अभियंता सायली पाटिल यांनी दिली.
दरम्यान दोन तीन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, काल पासून पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे.
सकाळी नदीपात्रात ८ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. आज १२ वाजता तो वाढवून १० हजार क्युसेक करण्यात आला असल्याने मुळा नदीवरील काही पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.