अहमदनगर ब्रेकींग: कॉफी शॉपवर अश्लील चाळे; पोलिसांच्या धाडी

अहमदनगर- कर्जत शहरातील चार कॉफी शॉपवर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आक्रमक भूमिका घेतली असून तब्बल चार कॉफी शॉपवर कारवाई करण्यात आली आहे. या कॉफी शॉपवर तरुण-तरुणींनी अश्लील चाळे करतात.
कर्जत शहरातील काळदाते कॉम्प्लेक्स येथील कॉफी अन् बरचं काही, मुनलाईट, फ्रेंडशिप, द कॉफी पॉईंट अशी कारवाई करण्यात आलेल्या कॉफीशॉपची नावे आहेत. कॉफी शॉपवर मुला-मुलींना, तरुण-तरुणींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते. तसेच कॉफीशॉपमध्ये बसून ज्यादा पैसे देऊन अनेक चुकीच्या गोष्टी करण्यात येतात, अशी तक्रार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना प्राप्त झाली होती.
या तक्रारीवरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या अधिकारी, पोलीस जवान आणि महिला पोलीस कर्मचार्यांनी नुकतेच स्टिंग केले. कॉफी शॉप चालकांनी या युगुलांसाठी वेगळे दरपत्रकही बनवले असल्याचे समोर आले आहे. त्यांना बसण्यासाठी अडोसा करून खास बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. जेणे करून तरुण तरुणींना अश्लील हावभाव,अश्लील कृत्ये,गैरप्रकार करणे सहज शक्य होते.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, भगवान शिरसाठ, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, गोवर्धन कदम, सलीम शेख, शाहूराज तिकटे, राणी व्यवहारे, राणी पुरी आदींनी केली आहे.