अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अपहरण करून दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर- पाथर्डी पोलीसांना अखेर दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणाचे गुढ उकलण्यात यश आले. या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शनिवारी ( दि 22 ) रोजी शहरातील दोन अल्पवयीन मुली गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पाथर्डी पोलीसांनी निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस पथके स्थापन करुन, तपासाची चक्रे गतिमान करत गुन्ह्याची उकल केली.

 

निवडुंगा शिवारातील हाँटेल पँराडाईज येथे छापा टाकला. यावेळी अपहृत मुली व संयित मागील दरवाज्यातुन पळुन गेले. हॉटेलच्या मागील बाजूस डोंगर व घनदाट झाडीचा भाग असल्याने, पोलीसांनी सुमारे अडीच तास डोंगरात पायपीट करीत रात्रीच्या अंधारात शोध घेतला.

 

दरम्यान, पिडीत मुलींना त्या आरोपीने शहरातील माणिकदौंडी चौकात आणुन सोडले असता त्या मुली घरी परतल्या. सोमवारी पोलीसांनी पिडीत मुलींचे जबाब नोंदवत तीन जणांना अटक केली आहे.

 

त्यातील अत्याचार करणारे दोघे, व त्यांना मदत करणारे चौघे आशा सहा जणांनी मिळुन हे दोन्ही गुन्हे एकत्रीत केल्याचे उघड झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. यातील तिघेजण अद्यापही फरार असून त्यांच्या शोधत पोलीस पथके रवाना झाली आहेत. पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तपास करीत आहेत.

 

दरम्यान पाथर्डी शहरासह तालुक्यातील लॉज चालविणारे मालक नियम व अटी चा भंग करीत असुन .शाळेतील विद्यार्थी शाळेच्या गणवेशावर लॉजवर जात असल्याचे उघड झाले आहे. लॉज मालक कोणतेही नियम पाळत नसल्याचे समोर येत आहे. या परिस्थितीत पालकांनी आपल्या पाल्याबाबत अधिक जागरूक होण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button