अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पुरवठा विभागाची मोठी कारवाई; 32 लाखांचा…

अहमदनगर- आज (रविवार) पहाटे मिरी ते पांढरीपुल रोडवरील खोसपुरी (ता. नगर) शिवारात पुरवठा विभागाने कारवाई करून अवैधरित्या ट्रकमधून वाहतुक केली जात असलेल्या 33 टन तांदूळ पकडला.

 

पुरवठा विभागाने ट्रक व त्यामधील सहा लाख 50 हजाराचा तांदूळ असा एकुण 31 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरवठा निरीक्षक शिवराज अंबादास पवार यांनी फिर्याद दिली आहे.

 

अशोक उध्दव पवार (रा. अंमळनेर भांड्याचे ता. पाटोदा, जि. बीड), सुनील कठाळे (रा. दहिवंडी ता. शिरूर कासार, जि. बीड), गोकुळ महादेव जाधव (रा. आर्वी ता. शिरूर कासार, जि. बीड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

 

रेशनिंगचा 33 टन तांदूळ दुसर्‍या गोण्यामध्ये भरून तो काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ट्रकमधून नेला जात असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे मिरी ते पांढरीपुल रोडवर खोसपुरी शिवारात पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी सापळा लावला. संशयीत ट्रक येताच पुरवठा विभागाने तो ट्रक पकडला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button