अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: जागेच्या वादातून पेटविलेल्या व्यक्तीचा मृत्यू; तिघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर- जागेच्या वादावरून बशीर दिलावरखान पठाण (रा. अमीर मळा, नगर) यांना तिघांनी अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले होते. नगर-औरंगाबाद रोडवरील अमीर मळा येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली होती. बशीर पठाण यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

 

दरम्यान मृत्यूपूर्वी बशीर यांनी दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुब दिलावर खान पठाण, आसीफ आयुब खान पठाण, गुलाब पठाण (सर्व रा. अमीर मळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

बशीर पठाण व त्यांचे भाऊ आयुब पठाण यांच्यात जमिनीचा वाद आहे. हा वाद न्यायप्रविष्ठ आहे. याच वादातून मंगळवारी सायंकाळी आयुब, आसीफ, गुलाब यांनी बशीर यांच्यावर शस्त्राने हल्ला करत डिझेल टाकून पेटवून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button