अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: विवाहितेचा छळ; माजी नगरसेवकांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर- विवाहित तरुणीला (वय 32) वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून त्रास दिला. या आरोपावरून पोलिसांनी श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवकासह विवाहितेचा पती व अन्य चार अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी पीडित विवाहित तरुणीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आपण सासरी नांदत असताना आरोपींनी चारित्र्यावर संशय घेऊन आपण घरी असताना घरात घुसून, मला धरून, लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग करून मारहाण केली.

 

तसेच घराच्या बाहेर काढून देऊन शिवीगाळ करत पुन्हा आमच्या घरी आली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

 

पीडित विवाहित तरुणीच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत माजी नगरसेवकासह विवाहितेचा पती व अन्य चार (सर्व रा. श्रीरामपूर) अशा सहा जणांविरुद्ध भा. दं. वि. कलम 143, 452, 354, 498 अ, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पो. नि. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. राशिनकर पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button