अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: निरीक्षणगृहातून अल्पवयीन मुलीला पळविले

अहमदनगर- येथील मुलींच्या शासकीय निरीक्षणगृहातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

निरीक्षणगृहाच्या काळजीवाहक रेखा विलास ठोंबरे (वय 46 रा. आलमगिर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. सदर अल्पवयीन मुलगी 28 जुलै, 2022 रोजी पुणे बस स्थानक परिसरात मिळून आली होती. तिला कोतवाली पोलिसांनी निरीक्षणगृहात ठेवले होते. सदर मुलीस 5 ऑगस्ट रोजी कोणीतरी अज्ञात कारणासाठी पळवून नेले.

 

ठोंबरे यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button