अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला पळविले

अहमदनगर- अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी रात्री ही घटना घडली.

 

पीडित मुलीच्या आईने गुरूवारी दुपारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी धुतलेला शाळेचा ड्रेस आपल्या नवीन घरामध्ये वाळायला टाकुन येते, असे म्हणून राहते घरातुन निघुन गेली.

 

फिर्यादी यांनी तिचा आसपासच्या परिसरात शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के.एस.साळुंके करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button