अहमदनगर ब्रेकींग: दोन चिमुकल्या मुलींसह आई बेपत्ता

अहमदनगर- विवाहिता तिच्या एक तीन व दुसर्या दीड वर्षाच्या मुलींसह केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागातून बेपत्ता झाली आहे. तिच्या पतीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार हे त्यांच्या पती व दोन मुलींसह केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागात राहतात. रविवारी ते दुपारी दीड वाजता कामावर गेले होते. ते रात्री साडे अकरा वाजता घरी आले असता त्यांना पत्नी व दोन्ही मुली घरात दिसल्या नाही. त्यांनी शोध घेतल्यानंतरही त्या मिळून न आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
तक्रारदार हे रविवारी दुपारी कामावर जाण्यासाठी दीड वाजता घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांची पत्नी व दोन्ही मुली घरात होत्या. ते रात्री साडे अकरा वाजता घरी आले असता त्यांना पत्नी व मुली घरात दिसल्या नाही. त्यांनी त्यांच्या सासूकडे यासंदर्भात चौकशी केली असता सासूने त्यांना सांगितले की, ‘आम्ही साडे दहा वाजता सोबत जेवण केले व ती मुलींना घेऊन तुमच्या घरी निघून गेली आहे’.
दरम्यान पत्नी व दोन्ही मुली घरी आल्या नसल्याने तक्रारदार यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्या मिळून आल्या नाही. त्यांनी सोमवारी पोलिसांत तक्रार दिली आहे. कोतवाली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.