अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: मुस्लिम धर्मगुरूची हत्या; तिघे जेरबंद

अहमदनगर – नाशिक जिल्ह्यातील येवला हद्दीत अफगाणिस्तान येथील मुस्लिम सुफी धर्मगुरुची हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती.

 

या हत्याकांडातील मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला बुधवारी रात्री एका हॉटेलवर राहुरी पोलिसांनी झडप घालून त्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्यासह पाच जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

 

संतोष हरिभाऊ ब्राह्मणे (वय 27 रा. समतानगर कोपरगाव), गोपाल लिंबा बोरगुले (वय 26 रा.चवडी जळगाव ता. मालेगाव), विशाल सदानंद पिंगळे (वय 23 रा. कोपरगाव) असे पकडलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.

 

पोलीस अधिकारी सज्जन नार्‍हेटा यांना नगर-मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या हॉटेल सर्जावर गावठी कट्यासह सराईत आरोपी जेवण करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नार्‍हेटा यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांना घटनेची खबर दिली.

 

त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा या हॉटेलकडे वळवला. राञी 10 वाजण्याच्या सुमारास हॉटेल सर्जावर जेवण करण्यासाठी बसलेल्या आरोपींवर पोलिसांनी झडप मारली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतुसे देखील आढळून आले. हा संपूर्ण थरार हॉटेलमध्ये असलेल्या ग्राहकांनी बघितल्यानंतर एकच दाणादाण उडाली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेटा हे करत आहेत.

 

याप्रकरणी मुख्य आरोपी संतोष हरिभाऊ ब्राह्मणे हा राज्य गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक तसेच नाशिक पोलीसांच्या रडारवर होता. याबाबत राज्य तपास यंत्रणा कसुन शोध घेत होती. मात्र तो मिळून येत नव्हता. याबाबत आणखी नवीन माहिती हाती येण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button