अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: रस्ता अपघातात वृध्द ठार

अहमदनगर- रस्ता अपघातात वृध्दाचा मृत्यू झाला. विनायक पोपट आवारे (वय 68 रा. उंबरे ता. राहुरी) असे मयत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

विनायक आवारे यांचा आज (मंगळवार) नगर-मनमाड रोडवरील विळद (ता. नगर) शिवारात अपघात झाला. ते जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

दरम्यान उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान मयत आवारे यांच्याकडे कोणते वाहन होते, त्यांना कोणत्या वाहनाने धडक दिली. याबाबतची माहिती मंगळवारी सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात प्राप्त झाली नव्हती. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button